हेक्टर म्हणजे किती जमीन ? हेक्टर चे गुंठा,एकर मध्ये कसे रुपांतर करायचे ?

हेक्टर म्हणजे किती जमीन ? हेक्टर चे गुंठा,एकर मध्ये कसे रुपांतर करायचे ? 1 हेक्टर म्हणजे किती जमीन ? हेक्टर चे गुंठा,एकर ,चौ .फुट चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं? पहा व्हिडिओ यासंबंधित माहिती आपण आज घेवूयात. जर आपण पूर्वीचे 7/12 उतारे ,दस्तऐवज किंवा जमिनीसंबंधीत कागदपत्रे पहिली तर यामध्ये आपल्याला चौ फुट,गुंठा,साखळी या एककात जमिनीचे आकारमान पहायला मिळायचे . त्यावेळी जमीन मोजणीसाठी फुट हे एकक जास्त वापरले जात होते. पण आताच्या नवीन पद्धतीमध्ये मीटर या मोजमाप एककाचा वापर केला जातो .त्यामुळे जमिनीचे आकारमान आपल्याला हेक्टर: आर:चौ मीटर यामध्ये पाहायला मिळते . 7/12 वर आपल्याला आर हा शब्द पाहायला मिळतो मग हे हेक्टर म्ह णजे काय ? हेक्टर म्हणजे किती जमीन? त्याचे गुंठ्यामध्ये,एकर, चौ फुटामध्ये रुपांतर कसे करायचे ? यासंबंधित अनेक प्रश्न निर्माण होतात. तर त्यासंबंधित माहिती आपण घेवूयात. आपला पहिला प्रश्न आहे हेक्टर म्हणजे काय ? हेक्टर हे मेट्रिक पद्ध...