होळी 2025 - होळी शुभेच्छा मराठी | होळी बद्दल संपूर्ण माहिती | holi wishes 2025 marathi







होळी 2025 - होळी बद्दल संपूर्ण माहिती | होळी शुभेच्छा मराठी  | holi wishes 2025 marathi 


     होळी कधी आहे ? - 13  मार्च 2025 रोजी होळी आहे .    



 होळी म्हणजे काय?

फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी साजरी करतात. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा होतो. पहिल्या दिवशी 'होलिका दहन' करतात, म्हणजे वाईट गोष्टी जाळून टाकतात. दुसऱ्या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून 'धुलिवंदन' किंवा 'रंगपंचमी' खेळतात. होळीला 'शिमगा' सुद्धा म्हणतात, आणि काही लोक याला 'शिव-शिमगा' म्हणतात, कारण ते भगवान शंकराशी संबंधित आहे.



होळी का साजरी करतात?

होळी साजरी करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे वाईट विचार आणि वाईट गोष्टींचा नाश करणे. आणि चांगले विचार, चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात आणणे. होळीमध्ये पुरणपोळी, रंग आणि धम्माल-मस्ती करायला खूप मजा येते.                          

                                                      


होळीची गोष्ट

खूप वर्षांपूर्वी, हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता. तो स्वतःला खूप ताकदवान समजायचा आणि देवांचा तिरस्कार करायचा. पण त्याचा मुलगा प्रल्हाद, भगवान विष्णूचा खूप मोठा भक्त होता. हे राजाला अजिबात आवडत नव्हते. त्याने प्रल्हादला खूप त्रास दिला, पण प्रल्हादने विष्णूची भक्ती सोडली नाही. मग राजाने एक योजना बनवली. त्याची बहीण होलिका, जिला आगीत न जळण्याचे वरदान होते, तिने प्रल्हादला घेऊन आगीत बसायचे असे ठरवले. प्रल्हाद आणि होलिका आगीत बसले, आणि प्रल्हाद विष्णूचे नाव घेत होता. थोड्याच वेळात होलिका जळायला लागली. तिला आठवले की, तिने जर तिच्या वरदानाचा वाईट उपयोग केला, तर ती स्वतः जळून जाईल. प्रल्हादला आगीने काहीही केले नाही, पण होलिका जळून राख झाली. त्या दिवशी लोकांनी आनंद साजरा केला, आणि तो दिवस 'होलिका दहन' म्हणून ओळखला जाऊ लागला. दुसऱ्या दिवशी लोकांनी रंग खेळून हा सण साजरा केला.   

                                          

   share on Whatsapp 


प्रेम आणि आनंद पसरवणे
आपण या सणाचा स्वीकार करत असताना,
या मनःपूर्वक शुभेच्छांसह प्रेम आणि आनंद पसरवूया
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!



होळी पेटू दे
द्वेष, चिंता मिटू दे
आगामी वसंत ऋतूत
तुमच्या आयुष्यात
सुख-समृद्धीने ओंजळ भरू देत
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!




आपल्या माणसांची साथ
पंगतीला पुरणपोळीचा थाट
होळीच्या अग्नित नकारात्मकतेचा होणार नाश
पुन्हा नव्याने होऊदेत तुमच्या आयुष्याची सुरुवात
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!





ताऱ्यांसारखी तेजस्वी, इंद्रधनुष्यासारखी रंगीबेरंगी आणि
लहान मुलाच्या हास्यासारखी आनंदी होळी येथे आहे.
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!






होळीच्या शुभमुहुर्तावर होईल स्वप्नपूर्ती,
धन,आनंदाने भरेल तुमची झोळी
मनात पेटवा आशेची आग
पूर्ण होऊदेत तुमच्या सर्व इच्छा
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!





तुमचे जीवन आनंदाचे, मैत्रीचे आणि प्रेमाचे रंग भरून जावो.
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 




जीवनात रंग भरणारा वर्षातील सर्वात महत्वाचा सण येत आहे,
तेव्हा आपण सर्वांना प्रेमाने रंगवू या.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा. 



होळी पेटू दे
द्वेष, चिंता मिटू दे
आगामी वसंत ऋतूत
तुमच्या आयुष्यात
सुख-समृद्धीने ओंजळ भरू देत
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 




तुम्हाला गोड क्षण आणि
रंगीबेरंगी आठवणींनी भरलेल्या
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!  





holi wishesh

होळी शुभेच्छा मराठी 

होलिका दहन कब है

होली कब है 2025 

Dhulwad 2025

holi wishes in marathi

holi wishes in marathi text