मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना .अर्ज व हमीपत्र DOWNLOAD. या योजनेचा लाभ कोणाला घेता येणार? योजनेसाठी पात्रता ? आवश्यक कागदपत्रे ? ऑनलाईन अर्ज कसा भरावा ? कोणते APP वापरावे ? APP डाउनलोड ? ऑफलाईन अर्ज कुठे / कोणाकडे भरावा ? या योजनेचा लाभ कोणाला घेता येणार नाही ?

Skill in Marathi


  मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना




अर्ज व हमीपत्र डाउनलोड 

या योजनेचा लाभ कोणाला घेता येणार? योजनेसाठी पात्रता ? 

आवश्यक कागदपत्रे ? 

ऑनलाईन अर्ज कसा भरावा ? कोणते APP  वापरावे ? APP डाउनलोड ?

ऑफलाईन अर्ज कुठे / कोणाकडे भरावा ? 

या योजनेचा लाभ कोणाला घेता येणार नाही ?



मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. या योजना अंर्तगत लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रति महिना दिले जातील. सदर योजनेत एका कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. वयाची अट वाढवण्यात आली असून, 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत., याशिवाय जमिनीच्या मालकीचीदेखील अट काढण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिन्याला महिलांना 1500 रुपये दिले जाणार आहेत. ही योजना गरीब महिलांसाठी असणार असून, पिवळं आणि केशरी रेशनकार्ड धारकांना याचा लाभ होणार आहे. तसेच त्यांचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 पेक्षा कमी असावं अशी आहे.पिवळे व केशरी कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही.






दि.31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.01 जुलै,2024  पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

* या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र (डोमशियाल सर्टिफिकेट) आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. जर लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15  वर्षापूर्वीचे

1 . रेशन कार्ड

2 . मतदार ओळखपत्र

3 . शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र

4 . जन्म दाखला

या 4  पैकी कोणतेही एक ओळखपत्र / प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.

* सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.

* सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21  ते 60  वर्ष वयोगट ऐवजी 21  ते 65  वर्ष वयोगट करण्यात येत आहे.

* परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे

1.जन्म दाखला

2.शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र

3.आधिवास प्रमाणपत्र

 या पैकी एक प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.

* रु. 2.5  लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.

* बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स.  ( बँक डिटेल्स )

* सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

 







लाडकी बहीण योजनेचा अर्ज – download करा. Click here


लाडकी बहीण योजनेचे हमीपत्र  – download करा. Click here






 या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज भरू शकता. त्यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे नोंदणी करावी लागेल. तर शहरी भागातील महिलांना वॉर्ड ऑफिसरकडे नोंदणी करावी. या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यास १ जुलैपासून सुरुवात झाली असून ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज संकलित करण्यात येणार आहेत.



ऑनलाईन अर्ज कसा करायचा. 

 1.सर्वप्रथम गुगल प्ले-स्टोअरवरून NARISHAKTI DOOT ‘नारीशक्ती दूत’ हे अॅप डाऊनलोड करा. त्यानंतर ज्या महिलेचा अर्ज भरायचा आहे, त्या महिलेचा मोबाईल क्रमांक टाकून लॉगीन करा.

APP डाउनलोड करण्यासाठी - क्लिक करा - CLICK  HERE


2.‘Accept Term and Condition’ वर क्लिक करा आणि स्वीकारा या पर्यायावर क्लिक करा.


3.ज्या मोबाईल क्रमांकाने तुम्ही लॉगीन केलं, त्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला ओटीपी प्राप्त होईल. तो ओटीपी दिलेल्या बॉक्समध्ये टाकून ‘व्हेरिफाय ओटीपी’ या पर्यायावर क्लिक करा.


4.त्यानंतर ‘तुम्हाला प्रोफाईल अपडेट करा’ असा संदेश येईल. तिथे ‘आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा’, या पर्यायावर क्लिक करा.


5. प्रोफाईल अपडेट करताना, तुमचं पूर्ण नाव, ईमेल आयडी (पर्यायी), जिल्हा, तालुका, नारीशक्तीचा प्रकार अपडेट करा.


6. प्रोफाईल अपडेट केल्यानंतर खाली ‘नारीशक्ती दूत’ या पर्यायावर क्लिक करा..


7.‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या पर्यायावर क्लिक करा.


8.महिलेचे संपू्र्ण नाव (आधार कार्डप्रमाणे), पतीचे किंवा वडिलांचे नाव, जन्म तारीख, जन्माचे ठिकाण (गाव/ शहर) पीन कोड, पूर्ण पत्ता, अर्जदार महिलेचा मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत आहे का?, वैवाहिक स्थिती आणि बॅंक खात्याच तपशील भरा.


9.संपूर्ण माहिती भरल्यानंतर आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखल/रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, (डाऊनलोड करून प्रिंट काढून त्यावर सही करा आणि पुन्हा अपलोड करा) आणि बॅंकेच्या पासबूकच्या फोटो आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करा, आणि खाली ‘जतन करा’. या पर्यायावर क्लिक करा.


10.तुम्ही भरलेली माहिती योग्य आहे की नाही, तपासून घ्या आणि ‘अर्ज दाखल करा’, यापर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल, तो ओटीपी भरून अर्ज दाखल करा.

12.केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकता.

 

 


 

या योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही?

*कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास त्यांना याचा लाभ मिळणार नाही.

कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/ उपक्रम/ मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे १,५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल. कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉपोरशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत. ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.





मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

How to apply for a ladki bahini yojana in Maharashtra?

Who can apply for Lek Ladki Yojana in Maharashtra?

Ladki bahini yojana online apply link

Ladki bahini yojana online apply link official

Ladki bahini yojana online form 2024

Ladki bahini yojana online apply document

How to apply ladki bahini yojana online apply

Ladki bahini yojana online apply official website maharashtra government

Ladli Behna Yojana Online Apply

Ladki bahin yojana online apply maharashtra

महाराष्ट्र माझी लाडकी बहिण योजना 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना gr pdf

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना online form pdf download

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना online form link

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना website

लाडकी बहीण योजना कागदपत्रे 2024

माझी लाडकी बहीण योजना online apply

Ladki bahin yojana online apply महाराष्ट्र

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र अर्ज pdf