घरासाठी कर्ज कसं मिळतं ? होम लोन प्रकार ,व्याजदर ,प्रक्रिया
Home loan types,intrest rate and process.
आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असत स्वतःच घर आणि त्यासाठी आपण पैशाची व्यवस्था करत असतो पैसे कमी पडले तर आपल्याला घरासाठी कर्ज काढावं लागत. घरासाठी काढलेल्या कर्जाला होम लोन म्हटलं जात . मराठी मध्ये आपण त्याला गृह कर्ज असं म्हणतो . हे होम लोन मिळत तरी कसं ? त्याची प्रोसेस काय असते ? या होम लोन चे प्रकार कोणकोणते आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण घेऊयात.
होम लोन संपूर्ण माहिती - व्हिडीओ पहा
होम लोन चे प्रकार जर आपण बघितले तर ते आपण घर कसे घेतो किंवा बांधतोय यानुसार आहेत.
१. नवीन घर खरेदी साठी गृह कर्ज loan for new home purchase
जर तुम्ही नवीन घर खरेदी करणार असाल विकत घेणार असाल तर हे कर्ज आपल्याला घ्यावं लागत. उदा नवीन फ्लॅट घ्यायचा असेल किंवा रॉ हाऊस /बंगलो ...
यांमध्ये बँक आपल्याला ८० ते ९० टक्के रक्कम देते.ती रक्कम बिल्डर ला बँकेकडून दिली जाते. जो पर्यंत कर्जाचे हप्ते पूर्ण होत नाहीत तोपर्यंत घरावर बँकेचा ताबा असतो. बँकेकडे घर गहाण राहते . कर्ज पूर्ण फिटल्यानंतर बँकेकडून noc दिली जाते.
२. जुने घर खरेदी साठी loan for old home purchase
जर तुम्ही जुने घर घेणार असाल तर हे कर्ज दिले जाते पण हे कर्ज देताना खूप मोठी प्रोसेस असते कर्जासाठी वेळ लागतो व सहजासहजी हे कर्ज भेटत नाही.
३ .बांधकाम करण्यासाठी loan for construction of house
जर तुमची स्वतःची जागा असेल तर जागेवर बांधकाम कारण्यासाठी बँक कर्ज देते. आपली जागा व त्यावर बांधलेली बिल्डिंग बँकेकडे गहाण राहते. जर आपली स्वतःची जागा असेल जागेची किंमत जास्त असेल तर कर्ज सहजपणे मिळते .
४. जागा खरेदी करण्यासाठी loan for purchase land
जर तुम्हाला घरासाठी जागा खरेदी करायची असेल तर त्यासाठी बँकेकडून कर्ज मिळू शकते . पण हे कर्ज देताना देताना आपल्या उत्पनाचा विचार केला जातो,सरकारी नोकरी किंवा जास्त पगाराची पर्मनंट अशी खाजगी नोकरी असेल ,किंवा जर तुमच व्यवसायातील उत्पन्न जास्त असेल तर हे कर्ज सहजपणे दिले जाते अन्यथा सहजासहजी हे कर्ज मिळत नाही
५. बिल्डिंग मध्ये वाढ / सुधारणा करण्यासाठी house Expansion / / devlopment
जर आपले जुने बांधकाम आहे आणि त्यात आपल्याला वाढ करायची असेल तर त्यासाठी हे कर्ज दिले जाते.
६. घराची दुरुस्ती करण्यासाठी home improvement
जर आपल्याला बिल्डिंग ची दुरुस्ती करायची असेल तर यासाठी हे कर्ज मिळते .
गृह कर्ज व्याज दर interest rate
जेव्हा आपण होम लोन घेतो ते दीर्घकालावधीसाठी घेतलं जात. कमीत कमी पाच वर्ष ते जास्तीत जास्त वीस वर्ष . आपण कर्ज घेताना बँकेकडून आपल्याला दोन पर्याय दिले जातात.
फिक्स व्याज दार व बदलता व्याज दर.
फिक्स व्याज दार हा कर्ज फिटेपर्यंत आहे तोच राहतो.
बदलता व्याजदर हा बँकेच्या धोरणानुसार कमीजास्त होत राहतो . गृह कर्जाच्या बाबतीत बदलत्या व्याज दराने घेतलेले कर्ज फायदेशीर राहू शकते .
कर्जाची प्रक्रिया home loan process
बँकेची निवड -
गृह कर्ज किंवा होम लोन घेण्यासाठी आपल्याला योग्य बँकेची निवड करावी लागते .यामध्ये सरकारी बँक ,खाजगी बँक ,फायनान्स कंपन्या व इतर अनेक पर्याय आहेत ,शक्यतो सरकारी बँक हा चांगला पर्याय आहे. सरकारी बँके तुन घरासाठी कर्ज मिळने थोडं अवघड काम असत पण तिथला व्याज दर कमी असतो ,सरकारी योजना व अनेक फायदे सुद्धा असतात.
कर्जाची माहिती
बँकेची निवड केल्यानंतर बँकेत जाऊन कर्जाची संपूर्ण माहिती घ्या . कर्जाची रक्कम ,तिची परतफेड पद्धत , व्याजदर ,सरकारी योजनांचा लाभ , बँकेचे नियम व इतर महत्वाची माहिती घ्या .
कर्जासाठी अर्ज
बँकेकडून कर्जासाठी दिलेला फ़ॉर्म भरावा लागतो.
कागदपत्रे
ओळखीचा पुरावा ,उत्पनाचा पुरावा व इतर अनेक कागतपत्रे आपल्याला जमा करावी लागतात.आपल्या उत्पनाचा विचार करून बँक कर्ज देत असते
बँकेकडून तपासणी
संपूर्ण कागदपत्र जमा झाल्यानंतर बँक त्याची तपासणी करते बांधकामाच्या ठिकाणी भेट देते त्याची खात्री करून घेते. आपल्या उत्पानांची तपासणीने करते आणि त्यानंतर कर्ज द्यायचं कि नाही हे ठरवलं जात.
कर्ज मंजुरी
जर आपण कर्ज मिळण्यास पात्र असेल त्यानंतर बँक आपल्या कर्जास मंजुरी देते.
कर्जाची रक्कम मिळणे
वेगवेगळ्या पद्धतीने कर्जाची रक्कम आपल्याला दिली जाते..
नवीन फ्लॅट च्या बाबतीत बँक कर्जाची रक्कम हि बिल्डर किंवा कंस्ट्रक्शन कंपनीच्या अकाउंट ला जमा करते .
कर्जाची परतफेड
प्रत्येक महिन्याला हप्ता भरून आपण ५ वर्ष ते ३० वर्ष या मुदतीत कर्जाची परतफेड करू शकतो. आधीमधी जास्त रक्क्कम भरून कर्जाची मुद्दल कमी करता येते. किंवा कालावधी समाप्त होण्याच्या आत कर्जाची परतफेड करता येते . पण यासाठी बँकेचे काही वेगवेगळे नियम असतात
What is home loan and types?
how many type of property loan ?
most commern home loan
home loan in india
home loan process in india