गुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी ? पहा मराठी मध्ये

Skill in Marathi


गुंठ्या मध्ये जमीन मोजणी कशी करावी ?
 How to measure land in guntha?
एक गुंठा म्हणजे किती जमीन ?
एकर मध्ये जमीन कशी मोजावी ?
हेक्टर म्हणजे किती जमीन ?

हे  प्रश्न बऱ्याच जणांना पडले  असतील  कारण आपल्याला हे माहित आहे कि जमीन गुंठ्यामध्ये मोजतो. पण गुंठा म्हणजे नेमकी किती जमीन,गुंठ्यामध्ये जमीन मोजणी कशी करायची असते हे फक्त त्या क्षेत्रात काम करणार्यांनाच माहित असते . 

जमिनीचा व्यवहार करताना किंवा जमिनीच्या कामासाठी आपल्याला जमिनीचे क्षेत्र ( area ) माहित असणे महत्वाचे असते.महाराष्ट्रात गुंठा हे एकक जमीन मोजणीसाठी जास्त वापरले जाते. गुंठ्यामध्ये जमीन मोजणी करणे हे काही अवघड काम नाही.कोणीही सातवी - आठवी शिक्षण झालेला माणूस जमीन मोजणी करू शकतो. पण सध्याची परिस्थिती पाहता ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना सुध्या ही माहिती नाही. आपण फक्त ७/१२ वर किती गुंठे आहे किंवा इतरांच्या सांगण्यावरून आपल्या जमिनीचे  मोजमाप ठरवतो.


  

आता गुंठ्यामध्ये जमीन मोजायची कशी हे पाहू 
A) जर आपली जमीन आयताकार किंवा चौरसाकार असेल म्हणजेच जमिनीच्या सर्व बाजू किंवा समोरासमोरील बाजूचे अंतर सामान असतील तर ... 

1 गुंठा म्हणजे  1089 चौरस फूट 
1 एकर म्हणजे 40 गुंठे 
1 हेक्टर म्हणजे 100 गुंठे 

1 . सर्वात पहिल्यांदा आपल्या जमिनीच्या बाजूंचे अंतर फुटामध्ये  मोजून घ्यावे. 
2. यामध्ये जमिनीची लांबी व रुंदी या दोन बाजू असतील त्यांचा  गुणाकार करावा. 
3 . येणारे उत्तर हे जमिनीचे क्षेत्रफळ असेल. त्या क्षेत्रफळास 1089 सोबत भागाकार करावा म्हणजे आपली जमीन किती गुंठे आहे हे उत्तर मिळेल . 

क्षेत्रफळ = लांबी  x रुंदी 
गुंठे = जमिनीचे क्षेत्रफळ ( चौरस फूट ) / 1089 
एकर = गुंठे  /  40 





B) जर जमिनीचा आकार आयात किंवा चौरस नसेल तर यासाठी जास्त गणिती पद्धत वापरण्याची आवश्यकता नाही आपण मोबाइल चा वापर करून कोणत्याही प्रकारच्या जमिनीच मोजमाप गुंठा व एकर मध्ये करू शकतो. त्यासाठी खालील व्हिडिओ मध्ये त्याची संपूर्ण माहिती उदाहरणासह दिलेली आहे ती पहावी जेणेकरून ती सहजपणे समजून जाईल. 





जमिनीची स्क्वेअर मीटर मधून गुंठ्यामध्ये मोजणी कशी करावी? चौ.मी चे गुंठ्या मध्ये रूपांतर




  Created  By, 
Madhav  Shukla ,Vita 










स्किल इन मराठी  - Skill In Marathi 

                                    सध्याच्या काळात शिक्षणापेक्षा जास्त महत्व हे  व्यावहारिक ज्ञानाला  व माणसामध्ये असलेल्या स्किलला आहे. आपण काय शिक्षण घेतले यापेक्षा आपण काय करू शकतो हे जास्त महत्वाचे आहे. 
नोकरी किंवा व्यवसाय या दोन्हीसाठी हे महत्वाचे आहे. यासाठी  लागणारी  माहिती  आपल्याला इंटरनेटवर  मिळते पण आपल्या मराठी भाषेत कमी प्रमाणात आहे . या वेबसाईटद्वारे नोकरी , व्यवसाय तसेच इतर व्यावहारिक कामांसाठी लागणारी माहिती आपल्यापर्यंत मराठी भाषेत पोहचवण्यासाठी केलेला एक छोटासा उपक्रम  आहे. 


                                                                          Created  By, 
Madhav  Shukla ,Vita